अब्बास-मस्तानच्या फिल्मची टिम हृदयांतर चित्रपटासाठी करतेय काम !

Vikram Film Crew 4

 

मराठी सिनेमाच्या इतिहासात प्रथमच एका बॉलीवूड सिनेमाची टीम मराठी सिनेमावर काम करत आहे,

फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस आता आपल्या पहिल्या हृदयांतर ह्या मराठी सिनेमाव्दारे निर्माता-दिग्दर्शक झाले आहेत. मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भुमिका असलेल्या ह्या सिनेमाचा नुकताच डिसेंबरमध्ये थाटात मुहूर्त समारंभ झाला.

विक्रम फडणीस प्रॉडक्शन्स, आणि यंग बेरी प्रॉडक्शन्स (प्रताप सरनाईक आणि पुर्वेश सरनाईक) ह्यांची निर्मिती असलेला ह्या सिनेमात पहिल्यांदाच एक हिंदी सिनेमाचा संपूर्ण क्रु काम करत आहे.

 

Vikram Film Crew 1

 

अब्बास-मस्तान ह्या फिल्म निर्माता-दिग्दर्शक व्दयीसोबत 10 पेक्षा जास्त चित्रपट विक्रम फडणीसने केले आहेत. अब्बास-मस्तान ह्यांच्या सिनेमासाठी आत्तापर्यंत अनेकदा कॉस्च्युम डिझाइन केल्यावर आता आपली मैत्री विक्रम अजुन नव्या स्तरावर घेऊन जात आहे. निर्माता-दिग्दर्शकाच्या ह्या यशस्वी व्दयींच्या प्रॉडक्शनचा संपूर्ण क्रु आता विक्रम फडणीसच्या सिनेमासाठी काम करतोय. डीओपी (डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी) सह सहाय्यकांचा आणि तंत्रज्ञांचा ह्यात समावेश आहे.

 

Vikram Film Crew 2

 

सूत्रांच्या अनुसार, “अब्बास-मस्तान ह्य़ांच्यासोबत विक्रम फडणीसचा खूप जुना ऋणानुबंध आहे. त्यांच्यासोबत विक्रम फडणीसने ब-याच अवधीपासून काम केले आहे. ह्या फिल्ममेकर व्दयींनी हृदयांतर सिनेमाच्या मुहर्ताच्या समारंभालाही आवर्जुन उपस्थिती लावली होती. आणि विक्रमला शुभेच्छा दिल्या होत्या.

Vikram Film Crew 3