फ्रेशर्स मधील सायली हि भूमिका करणारी मिताली मयेकर हिने तिच्या भूमिकेद्वारे आजच्या युथ वर एक प्रकारची मोहिनी टाकलीय. आजची तरुणाई सायली च्या प्रेमात आहे. आपली (गर्ल) फ्रेंड हि सायली सारखीच सुंदर, हुशार आणि बिनधास्त असावी. तिच्याबरोबर आपलयाला बऱ्याच गोष्टी शेअर करता आल्या पाहिजेत अश्या काहीश्या कल्पनांमध्ये आजची तरुणाई स्वप्न बघत आहे. तिच्या फॅन्स ची संख्या सुद्धा वाढत आहे. गेल्या वर्षात झी युवावरील “फ्रेशर्स” या नव्या मालिकेमुळे तिने अनेक फॅन्स कमावले. आता २०१६ गेले आणि २०१७ चे नवीन वर्ष सुरु झाले. गेल्या वर्षभरात आपण काय कमावले आणि काय गमावले याचा प्रत्येक जण विचार करत असतो. नवीन वर्षात नवीन नवीन संकल्प करत असतो. मितालीने सुद्धा गेल्या वर्षाच्या सुरुवातीला असे बरेच संकल्प केले होते.  त्यातील काही पूर्ण झाले आणि काही अपूर्ण राहिले. पण तिच्या आयुष्यातील एक गोष्ट मात्र कायम आहे आणि ते म्हणजे तिचे मोमोज. वाट्टेल ते होऊ दे, जग इकडचं तिकडे होऊ दे , पण दिवसभरात मिताली कमीत कमी एकदा तरी मोमोज खातेच , फ्रेशर्स च्या सेट वर सुद्धा तिच्या खाण्यात मुद्दाम मोमोज आणले जातात . फ्रेशर्स मधील सायली हे कॅरेक्टर मस्ती करणारं असलं तरी तेवढंच मॅच्युअर सुद्धा आहे . पण मोमोज पाहिल्यानंतर मितालीची रिऍक्टशन पाहिल्यावर मात्र बाकी फ्रेशर्सना हीच का ती सायली असा प्रश्न पडतो . मिताली मोमोजसाठी पूर्णपणे वेडी आहे .या संदर्भात मितालीला विचारले असता ती म्हणाली , मोमो चीनमध्येही सर्वत्र आवडीने खाल्ला जाणारा आणि चीनी कुसीनची खासियत म्हणून मिळणारा पदार्थ आहे… वेगवेगळ्या सामिश व भाज्यांचे सारण घालून केलेले व वेगवेगळ्या आकारांचे १५-२० किंवा त्यापेक्षा जास्तच प्रकार मिळतात.मोमोज हा पदार्थ आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीतला आद्य समजला जाणारा, मोदकासारखा दिसणारा असल्याने मोमोजला पाहताचक्षणी मोदकाची आठवण येते.मोमो तर मी चीनी मोदक म्हणत पटापट गट्टम करते .व्हेज मोमोजमध्ये  शिमला मिरची, कोबी, गाजर, पनीर, तिळाचे तेल, काळी मिरची, लाल मिरची, हिरवी मिरची, अद्रक, सोया सॉस, कोथिंबीर असं बरंच काही असतं जे माझ्या काय पण तुमच्या पण तोंडाला पाणी सोडेल .असं म्हणतात कि नॉनव्हेज मोमोजची मजाच वेगळी आहे पण मी पूर्णपणे शाकाहारी असल्याने मला  व्हेज मोमोज आवडतात . आमच्या ठाण्यामध्ये एक फक्त  मोमोज चे फंडू हॉटेल आहे मी तिथे नेहमीच मोमोज साठी जाते . आणि फ्रेशर्स मुळे सध्या मला तिथे स्पेशल फ्रेशर्स डिस्काउंट सुद्धा मिळतं .. मोमोज बद्दलच मितालीच नॉलेज आणि आणि तिची आवड लक्षात घेता जर सायलीचा नंबर १ फॅन बनायचं असेल तर मितालीला काय आवडत आहे लक्षात येतंय ना  ?

 

mitali-with-momojmitali-1mitali-2mitali-3mitali-5mitali-4