‘लव बेटिंग’

 

01

 

प्रेम शब्दात व्यक्त करणे अवघडच…

प्रेमाची परिभाषा व्यक्तीगणिक वेगळी असू शकते. कोणासाठी त्याग, कोणासाठी विश्वास

तर कोणासाठी समर्पण हे प्रेम असू शकतं. प्रेम या संकल्पनेवर बेतलेला ‘लव बेटिंग’

हा नवा सिनेमा लवकरच येऊ घातला आहे. ‘एस. एन. फिल्मस एंटरटेनमेंट्स’ प्रस्तुत या

चित्रपटाची निर्मिती लालचंद शर्मा, सुनिता शर्मा यांनी केली असून दिग्दर्शन राजू

मेश्राम करणार आहेत.

 

6

‘लव बेटिंग’ चित्रपटाच्या

चित्रीकरणाचा शुभारंभ नुकताच मा. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या शुभहस्ते क्लॅप

देऊन करण्यात आला. यावेळी चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञासह मा. नगरसेवक राजन किणी

देखील उपस्थित होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा देत, ‘मराठी

चित्रपटसृष्टीत अलीकडच्या स्थित्यंतरांमध्ये हा चित्रपट मोलाची भूमिका बजावेल’,

असे मत व्यक्त केले. ‘लव बेटिंग’ चित्रपटाच्या निमित्ताने चिराग पाटील,

काजल शर्मा, सयाजी शिंदे, अनंत जोग, राजेश शृंगारपुरे, स्मिता गोंदकर, कमलेश

सावंत, वैभव मांगले, अनिकेत केळकर अशी जबरदस्त स्टारकास्ट प्रथमच एकत्र आली आहे.

 

प्रेम या संवेदनशील विषयातील चढ-उतार, रेखाटणारा

हा सिनेमा प्रेक्षकांना निश्चितच आवडेल असा निर्माता –दिग्दर्शक यांना विश्वास आहे.

चित्रपटाची कथा-पटकथा व संवाद दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी लिहिले आहेत. कौतुक

शिरोडकर, राजू मेश्राम लिखित यातील गीतांना प्रवीण कुंवर यांनी संगीताची साथ दिली

आहे. ‘लव बेटिंग’ चित्रपटाचे छायाचित्रण अनिकेत खंडागळे करणार असून वेशभूषा

पूनम चाळके तर कला दिग्दर्शन अनिल वठ यांचे आहे.

 

02