‘७०२ दीक्षित’ फक्त मराठी चित्रपट वाहिनीवर

‘फक्त मराठी’ चित्रपट वाहिनी नेहमीच रसिक प्रेक्षकांसाठी दर्जेदार मराठी चित्रपटांचा खास नजराणा घेऊन येत असते. ‘फक्त मराठी’ वाहिनेने, अल्पावधीतच विविध चित्रपट तसेच कार्यक्रमांनी रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान  निर्माण केलं आहे. गूढ, रहस्यमयी चित्रपट कमी प्रमाणात पहायला मिळतात म्हणूनच ‘फक्त मराठी’ खास आपल्या प्रेक्षकांसाठी ‘७०२ दीक्षित’ हा थरारपट घेऊन आले आहेत. येत्या रविवारी ५ फेब्रुवारीला दु. १२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. दीक्षितांच्या परिवारात घडणाऱ्या अगम्य घटना पहायला विसरू नका.

ही कथा करीअरिस्ट दीक्षित जोडप्याची आहे. काव्या, यश आणि त्यांची मुलगी रेवा यांच्या सुखी कुटुंबात अचानक एक वादळ येतं. त्यांच्या घरात काम करणारी मोलकरीण आशा या सगळ्याला कारणीभूत आहे का? असं काय घडतं ज्यामुळे हे सुखी-समाधानी त्रिकोणी कुटुंब उद्धवस्त होतं. यश आणि काव्याचे नातेसंबंध आतल्या-आत धुमसत होते का? या सगळ्या वरकरणी आलबेल दिसणाऱ्या नातेसंबंधात नेमकं लपलंय तरी काय? काव्याला कसा होणार या गूढ गोष्टींचा उलगडा हे ‘७०२ दीक्षित’ चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही. गौरी निगुडकर, पल्लवी पाटील, विजय आंदळकर, जयवंत वाडकर, श्रीरंग देशमुख, रुची जाईल आणि विक्रम गोखले या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. उत्कंठावर्धक घटनांचा भावनिक कल्लोळ असणारा कौटुंबिक चित्रपट ‘७०२ दीक्षित’ रविवारी ५ फेब्रुवारीला दु. १२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. ‘फक्त मराठी’ चित्रपट वाहिनीवर नक्की पहा.

 

702-Dixit